Intraday Trading Tips in Marathi 

इंट्राडे ट्रेडर्स हे लॉन्ग-टर्म  गुंतवणूकदारांपेक्षा मार्केटमध्ये अधिक अस्थिरता अनुभवत असतात. तथापि, तुम्ही  इंट्राडे ट्रेडर्स या विषयी योग्य ज्ञान मिळवून इंट्राडे ट्रेडिंगमधून अधिक नफा कमवू शकता। परंतु असे अनेक ट्रेडर्स आहे जे  इंट्राडे ट्रेडिंग मध्ये यश मिळविण्यासाठी नेहमी सतत एका योग्य (intraday trading tips in Marathi) शोधत राहत असतात।  

कारण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ट्रेडर्स यांना त्याचे पैसे सहज गमावण्याची शक्यता असते आणि म्हणूनच ट्रेडिंग कसे शिकायचे हे जाणून घेण्यासाठी अनेक असे ट्रेडर्स नेहमीच उत्सुक असतात। 

इंट्राडे ट्रेडिंग शिकण्यासाठी अनेक पर्याय अव्हेलेबल आहेत। आणि त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शेअर मार्केट यातील योग्य टिप्स आणि त्याचे नियम समजून घेणे आणि त्या नियमाचे पालन करणे।  

या लेखात काही इंट्राडे ट्रेडिंग टिप्स दिल्या आहेत, ज्याचे अनुसरण करून एक नवीन आणि अनुभवी ट्रेडर्स हे आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये अधिक नफा कमवू शकतात।  

चला तर मग सुरुवात करूया।  

इंट्राडे ट्रेडिंग टिप्स

आता जसे कि तुम्हाला माहिती आहे की इंट्राडे ट्रेडिंग यामध्ये तुम्हाला त्याच दिवसात शेअर्सला खरेदी करावे लागते आणि त्याच असणाऱ्या सेम दिवशी शेअर्स ची विक्री सुद्धा करावी लागते। म्हणून नेहमी आपल्याला  असे स्टॉक्स निवडावे लागतील ज्यात अस्थिरता हि जास्त असेल।  

intraday trading tips in marathi

या कारणास्तव, इंट्राडे ट्रेडिंग हे आपल्यासाठी धोकादायक पण असू शकते, परंतु त्याचे योग्य ज्ञान अवगत करून आणि ते समजून घेऊन, तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये यश मिळवू शकता। त्यामुळे शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग कसे करायचे असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ? चला तर मग खाली तपशीलवार दिलेल्या योग्य (intraday trading tips in Marathi) टिप्सपासून सुरुवात करूया।  

 1. इंट्राडे साठी स्टॉकची निवड कशी करायची 

जसे कि तुम्हाला माहिती आहे की इंट्राडे ट्रेडिंग यामध्ये, शेअर्सची खरेदी आणि विक्री हि मार्केट बंद होण्याच्या पूर्वी केली जाते।  किंवा तुमच्या असलेल्या सर्व पोजीशन पोझिशन्स या स्क्वेअर ऑफ होत असतात।  

आपल्यासाठी आजची पहिली टीप म्हणजे मध्यम (मिड) कॅप स्टॉक आणि स्मॉल कॅप स्टॉक्स ज्याच्या मध्ये  लिक्विडिटी आहे असे स्टॉक इंट्राडे ट्रेडिंगसाठी निवडा।  

तुम्ही तुमच्याकडे असलेले सर्व ट्रेडिंगचे पैसे फक्त एकाच स्टॉकमध्ये गुंतवू नका।  कारण यामुळे  तुम्हाला तुमची जोखीम कमी करण्यात आणि तुमची इंट्राडे ट्रेडिंग धोरण संतुलित ठेवण्यास मदत करते।  

एका योग्य स्टॉक ची  निवड कशी करावी यासाठी, तुम्ही शेअर मार्केट याशी संबंधित पुस्तके (stock market books) देखील वाचू शकता।  

 1. इंट्राडे ट्रेडिंगसाठी स्टॉक निवड करण्याची प्रक्रिया

इंट्राडे ट्रेडर्स अनेकदा ट्रेडिंग व्हॉल्यूमवर आधारित स्टॉकची  निवड  करण्याचा  निर्णय घेत असतात।  साधारणपणे, आपल्यासाठी असे चांगले असते कि  आपण अश्या स्टॉक ची निवड केली पाहिजे जे जास्त वॉल्यूम मध्ये  ट्रेड होत आहे।  

कारण जर ट्रेडिंग व्हॉल्यूम हा जर जास्त असेल, तर त्यानुसार त्याच्या किंमतीत अस्थिरता असते, ज्यामुळे तुम्हाला त्यातून नफा मिळविण्याची अधिक संधी मिळत असते।  

एका योग्य स्टॉक निवड करण्यासाठी तुम्ही बातम्यांचे अनुसरण देखील करू शकता। बहुतेक प्रकरणांमध्ये, जेव्हा चांगली बातमी येते तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत हि वाढत असते।  न्यूज़ आणि व्हॉल्यूम यांच्या  आधारे तुम्ही ज्या स्टॉकची निवड केली आहे त्याचे तुम्ही टेक्निकल एनालिसिस करू शकता।  

ज्याद्वारे तुम्ही त्यांचा ट्रेंड, सपोर्ट,आणि रेजिस्टेंस लेवल माहिती करून घेऊ शकता। आणि यासोबतच स्टॉकमधील होणाऱ्या मोव्हमेन्ट म्हणजेच हालचालींबद्दल माहिती देखील मिळवू शकता।  

सपोर्ट आणि  रेजिस्टेंस बद्दल अचूक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग फॉर्म्युला देखील वापरू शकता जे तुम्हाला एक चांगला निर्णय घेण्यास मदत करते।  

जर तुम्ही सुरुवातीचे ट्रेडर असाल म्हणजेच नवशिके असाल तर स्टॉकचे तांत्रिक विश्लेषण समजून घेण्यासाठी तुम्ही तांत्रिक विश्लेषण (टेक्निकल एनालिसिस) यावर आधारित पुस्तके (technical analysis books in Marathi ) वाचू शकता। 

 1. प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या वेळ जाणून घ्या 

आता स्टॉक निवड केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट एक योग्य वेळ ठरवणे आहे। ज्यानुसार तुम्ही तुमची इंट्राडे ट्रेडिंग पोझिशन घेऊ शकता।  अनेक वेळा ट्रेडर स्टॉकमध्ये  एक पोजीशन घेतात परंतु ते योग्य वेळी एग्जिट न घेतल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागते।  

स्टॉकची किंमत वाढत आहे हे बघून बरेच नवीन ट्रेडर अधिक लोभी होतात, परंतु त्याच्या असणाऱ्या अस्थिरतेमुळे, स्टॉक कधी विरुद्ध दिशेने जाऊ लागेल हे सांगणे कठीण आहे।  

असे आव्हान नेहमी नवीन सुरुवात करणाऱ्या एका ट्रेडर समोर येत असते।  

म्हणून स्टॉकमधील पोझिशन घेण्याची आणि त्यातून (बाहेर पडण्याची) एग्जिट घेण्याची वेळ हि तुमची ट्रेडिंग यशस्वी करण्यात मोठी भूमिका बजावते।  

 1. स्टॉप लॉस स्तर सेट करा

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये, कधी कधी अशी पण होण्याची शक्यता असते कि तुम्ही जो स्टॉक निवडलेला आहे तो वाढण्याऐवजी त्यात घसरण झाली आहे। म्हणून त्यामुळे तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ होण्यापूर्वी शेअरची किंमत किती घसरू शकते ते ठरवा.अश्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी राहत असते।  

अनुभवी ट्रेडर सल्ला देतील की हाच  सर्वात महत्वाचा उपाय आहे।  त्यामुळे, तुमच्यासाठी स्टॉप लॉस ऑर्डर (stop loss meaning in Marathi )  जाणून घेणे आणि त्याची योग्य ट्रिगर प्राइस ठरवणे महत्त्वाचे आहे।  

हे आता आपण एका उदाहरनाने म्हणून समजून घेऊया, समजा तुम्ही 200 रुपयांना खरेदी केली आहे। आणि तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर 5% (190) वर सेट केली आहे, जर स्टॉकची प्राइस 190 रुपयांपर्यंत पोहोचली आणि त्याची किंमत कमी होण्याची शक्यता आहे आणि स्टॉकची प्राइस  रु.  180 किंवा त्याहून कमी झाली, तर स्टॉप लॉस ऑर्डर आपोआप अंमलात येईल, आणि ट्रेड  रु. 190 वर अंमलात येईल। 

स्टॉप लॉस ची वैल्यू प्रविष्ट करण्यासाठी तुम्हाला एक  ट्रिगर प्राइस देखील प्रविष्ट करणे आवश्यक आहे।  

ही ती प्राइस आहे ज्यावर स्टॉकची किंमत उलट दिशेने जात असते  तेव्हा तुमच्या ऑर्डरचे डिटेल एक्सचेंजला पाठवले जातात।  

समजा तुम्ही स्टॉप लॉस रुपय 190 वर ठेवला आहे, तर ट्रिगर किंमत रु 190 पेक्षा थोडी जास्त असेल. म्हणजेच ती रुपय 192 असेल येथे, जेव्हा स्टॉकची प्राइस हि 192 पर्यंत पोहोचली जाईल, तेव्हा तुमची ऑर्डर ट्रिगर केली जाईल आणि एक्सचेंजमध्ये त्याची नोंदणी केली जाईल आणि जेव्हा प्राइस हि आणखी घसरेल आणि 190 वर पोहोचेल, तेव्हा तुमची ऑर्डर कार्यान्वित केली जाईल।  

अशा प्रकारे, या स्तरापर्यंत माहिती जाणून घेण्यासाठी, शेअर बाजाराचे गणित नीट समजून घ्या आणि त्यानुसार योग्य वैल्यू वर एग्जिट करून तुम्ही तुमचा तोटा मर्यादित करू शकता।  

जे सुनिश्चित करते की तुम्हाला जास्त नुकसान सहन करावे लागणार नाही।  

 1. टारगेट पर्यंत पोहचल्यावर नफा बुक करा

यशस्वी इंट्राडे ट्रेडर्समागील रहस्य म्हणजे उच्च लेवेरज (Leverage) आणि जास्त मार्जिन (Margin)  ज्याचा ट्रेडर्स  फायदा घेतात। लेवेरज आणि मार्जिन नफा वाढवण्यास मदत करतात (आणि तोटा देखील)।  

एकदा टारगेट पर्यंत पोहचल्यावर फार लोभी होऊ नये ही यामागची युक्ती आहे।  नुकसानीच्या सापळ्यात सापडण्यापासून वाचा, जिथे तुम्हाला किंमत वाढण्याची अपेक्षा आहे।   परंतु, स्टॉक योग्य दिशेने जाईल यावर विश्वास ठेवण्याचे तुमच्याकडे योग्य कारण असल्यास,तरच  त्यानुसार स्टॉप-लॉस सेट करा।  

 1. मार्केटला आव्हान देऊ नका

मार्केटची हालचाल आधीच जाणून घेणे आणि मार्केट दुसऱ्या दिवशी कसा ओपन होईल हे सांगणे जवळजवळ अशक्य आहे।  

जसे कि तुम्हाला माहिती आहे की, सर्वच घटक बुलिश मार्केट (तेजीच्या) शक्यतेकडे निर्देश करत आहेत. आणि त्यानंतर, तुमचा टार्गेट स्टॉक वाढेल अशी तुमची अपेक्षा आहे. पण जर मार्केट मध्ये  शेअरची किंमत वाढत नसेल तर अश्या वेळेस  शेअर विकण्याचा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो।  

 1. नवशिक्या ट्रेडर्सनी पहिल्या तासात ट्रेड करू नये

इंट्राडे ट्रेडर्ससाठी सर्वोत्तम सल्ला असा आहे की त्यांनी मार्केट उघडताच लवकरात लवकर ट्रेड करणे टाळावे कारण या काळात बाजारातील अस्थिरता जास्त असते।  

अनेक अनुभवी ट्रेडर हे  इंट्राडे ट्रेडिंगसाठी 9:30 ते 10:30 ही वेळ सर्वोत्तम वेळ मानतात।

 शेअर बाजार खूप अस्थिर आहे त्यामुळे ट्रेडरने सुरवातीला मार्केट च्या हालचालीला योग्य प्रकारे समूजन घेतले पाहिजे आणि नंतरच त्याने ट्रेडिंग सुरू केली पाहिजे। 

 1. इंट्राडे ट्रेडिंग नियमांचे पालन करा

एका यशस्वी इंट्राडे ट्रेडिंग यासाठी, इंट्राडे ट्रेडिंग नियम (intraday trading rules in Marathi ) पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे। मार्केटमध्ये बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेले नेहमी असं सल्ला देतात की जेव्हा मार्केट हे उघडते तेव्हा स्टॉक ची खरेदी आणि विक्री करण्यापासून आपण वाचले पाहिजे कारण कंपनीचे स्टॉक साधारणता मार्केट उघडताच दिवसाच्या पहिल्या घंटामध्ये ते खूप अस्थिर असतात

एक नवीन ट्रेडर असणाऱ्या ट्रेडरने  सुरुवातीला कमी पैशांनी ट्रेड केले पाहिजे 

मार्केट यामधील अस्थिरतेचा विचार करण्यासाठी ट्रेडर्स यांनी त्यांचे इंट्राडे ट्रेडिंग ची रणनीती पहिलेच तयार करून ठेवली पाहिजे

काही सुरुवातीचे ट्रेडर्स पेपर ट्रेडिंग करून इंट्राडे ट्रेडिंग मध्ये नफा मिळवू शकतात

 1. शेअर मार्केट चार्ट समजून घ्या

शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट चार्टचे खूप महत्वाचे योगदान आहे, परंतु त्यासाठी महत्वाचे आहे कि एका  योग्य चार्ट निवड करणे आणि नंतर योग्य टाइम फ्रेमला निवडून त्याचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे।  

जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही नवीन असाल तर शेअर मार्केट चार्टची माहिती मिळवा आणि त्यानुसार तुमचे ट्रेड निर्णय घ्या।  

डेली चार्ट शार्ट टर्म स्टॉक प्राइस ला तपासण्यात मदत करत असते। आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेग वेगळ्या टाइम फ्रेममध्ये चार्ट पाहणे निवडू शकता। 

योग्य टाइम फ्रेम आणि चार्ट  यांचा योग्य वापर करण्यासाठी शेअर बाजार समजून घ्या। शेअर मार्केट शिकण्यासाठी तुम्ही योग्य पर्याय शोधत असाल, तर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन असलेले पर्याय निवडू शकता।  

निष्कर्ष

इंट्राडे ट्रेडिंग (intraday trading)  वेळेत अधिक पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग आहे। 

इंट्राडे ट्रेडर्स हे  शेअर बाजारातील असणाऱ्या अस्थिरतेतून नफा मिळवू शकतात। विविध घटकांमुळे शेअरच्या किमती यामध्ये  चढ-उतार होत असते आणि त्यातून नफा मिळवणे हे ट्रेडर्सचे उद्दिष्ट आहे। आणि या अस्थिरतेतून तुम्ही शेअर मार्केटमधून अधिक नफा कमवू शकता।  

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये नफा हा होत असतो पण या नफ्याव्यतिरिक्त, इंट्राडे ट्रेडिंगशी संबंधित काही तोटे देखील आहेत,म्हणून ट्रेडर्स यांनी  इंट्राडे ट्रेडिंग (intraday trading tips in Marathi) टिप्सचे योग्य प्रकारे अनुसरण केले पाहिजे आणि नफा मिळविण्यासाठी योग्य स्ट्रेटेजी तयार करणे शिकले पाहिजे।  

त्यामुळे जर तुम्ही trading knowledge in Marathi यासाठी एक  योग्य व्यासपीठ ( प्लेटफार्म) शोधत असाल, तर Stock Pathshala app  मध्ये, ही सर्व माहिती तुम्हाला stock market classes द्वारे सहजपणे दिली जाते। ज्यामुळे तुम्ही तुमचा नफा वाढवण्यासाठीच नव्हे तर तुमचे नुकसान कमी करण्यासाठी देखील क्लासेस करू शकता।  

या लेखात दिलेल्या टिप्स तुम्हाला एक योग्य स्टॉक निवडण्यात आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतील जेणेकरून तुम्ही अधिक नफा कमवू शकाल।  

Before investing capital, invest your time in learning Stock Market.
Fill in the basic details below and a callback will be arranged for more information:

  Leave a Comment

  Your email address will not be published. Required fields are marked *

  Book Your Free Demo Class To Learn Technical Analysis