Call and Put Option in Marathi

call and put option in marathi

शेअर मार्केट मध्ये अनेक विविध प्रकारचे  ट्रेडिंग सेगमेंट आहेत, पण जे ट्रेडर्सना सर्वात जास्त आकर्षित करते ते म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग। ऑप्शन ट्रेडिंगबद्दलहा एक प्रकारचा कॉन्ट्रैक्ट असतो  जो एका बायरला ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड सेटल करण्याचा अधिकार देतो  परंतु त्याबद्दल त्याला बाध्य करत नाही । आता या ऑप्शनचे दोन प्रकारचे असतात, जे आहेत कॉल आणि पुट ऑप्शन (call and put option in Marathi), ज्याबद्दल आपण आज या लेखात सविस्तर पणे माहिती घेणार आहोत।

कॉल आणि पुट ऑप्शन म्हणजे काय

पण ऑप्शन ट्रेडिंगचे प्रकार समजून घेण्याआधी आपण ऑप्शन ट्रेडिंग (option trading in Marathi)  ला आणखी  चांगल्या प्रकारे समजून घेऊया।

आता असे समजून घेऊया कि तुम्ही समजा एका ठोक भाजी विक्रेते आहात. आणि भाजीपालाचा  माल मंडी पर्यंत नेण्यासाठी तुम्ही  ट्रांसपोर्टेशनची मदत घेत असता।

 बाजारात डिझेल किंवा पेट्रोलचे दर वाढले तर तुम्हाला भाजीपाल्याचा माल ट्रांसपोर्टेसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. या परिणामी स्वरूप , हा अतिरिक्त खर्च तुम्हाला करावा लागला आणि या अतिरिक्त खर्चाचा समतोल साधण्यासाठी तुम्ही भाज्यांचे भाव वाढवाल।

call & put option in marathi

आता या वरील संपूर्ण घटनेकडे  व्यवस्थित पणे पाहिले तर तुमच्या असे लक्षात आले असेल की पेट्रोल किंवा डिझेलचे दर वाढले तर भाज्यांचे  भावही वाढतील।

ठीक त्याचप्रमाणे, इक्विटी ऑप्शन (equity Option) देखील एक डेरीवेटिव इंस्ट्रूमेंट (Derivative Instrument) आहे, ज्याच्या किंमती इतर फाइनेंशियल प्रोडक्ट (Financial Product) च्या हालचालीवर अवलंबून असतात।

हे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट एका विशिष्ट  वैल्यू (option premium) आणि वैलिडिटी सोबत  येत असतात ।

आणि ते ऑप्शन बायर सेलरला (option writer) प्रीमियम देतात आणि ज्या प्राइस वर ऑप्शनला निवडले होते त्याच निवडलेल्या स्ट्राइक किंमतीवर ऑप्शनचा ट्रेड करण्याचा अधिकार प्राप्त करतात

आता शेअर मार्केट या मधील होणारे सर्व ट्रेड हे चालू असणाऱ्या ट्रेंडवर अवलंबून आहेत,जर ट्रेंड हा बुलिश असेल तर तुम्ही लाँग पोझिशन घेता आणि इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जर ट्रेंड हा बेयरिश असेल तर तुम्ही शॉर्ट पोझिशन घेत असता।

कॉल आणि पुट ऑप्शन (call and put option in Marathi) हे  डेरिव्हेटिव्ह मार्केट मधील याच  ट्रेंडवर आधारित असलेले दोन प्रकारचे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आहेत। 

आता ते नेमके काय असते या बद्दल जाणून घेऊया।

कॉल ऑप्शन म्हणजे काय ?

हे समजून घेण्यासाठी आपण एक ऑप्शन ट्रेडिंग चे उदाहरण घेऊ या

आपण असे गृहीत धरू की रिलायन्सचा शेअर ₹2000 वर ट्रेड करत आहे आणि एका महिन्या मध्ये  त्याचा तिमाही अहवाल  येणार आहे । ज्याबद्दल तुम्ही खूप सकारात्मक आहात

यामुळेच तुम्हाला त्याचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत पण तुमचे विश्लेषण चुकीचे असू शकते असे तुम्हला वाटते  आणि त्यामुळे तुम्ही जोखीम घेऊ इच्छित नाही ।

त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही कॉल ऑप्शन विकत घेण्याचा निर्णय घेता।

आपण असे गृहीत धरू की प्रत्येक  शेअर चा प्रीमियम ₹100 प्रति  शेअर या प्रमाणे आहे आणि एका लॉटमध्ये 250 शेअर्स आहेत, तर या प्रकारे आपण एक ट्रेड करण्यासाठी  (250*100)  याप्रमाणे  ₹25000 दिले आहेत।

एक ट्रेडर कॉल ऑप्शनची तेव्हाच खरेदी करतो जेव्हा तो मार्केट किंवा स्टॉक च्या संबधामध्ये बुलिश असतो। आणि  एक बायर  हा  नेहमी पोझिशन घेण्यासाठी प्रीमियम भरत असतो

आता आपण असे गृहीत धरू की एका महिन्या नंतर, रिलायन्सचा अहवाल खूप चांगला आला।

ज्यामुळे त्याच्या शेअरची किंमत वेगाने वाढू लागली आणि एक्सपायरी डेटपर्यंत तो 2300 रुपयांपर्यंत पोहोचला

आता कारण तो ऑप्शन सेलर ज्याने प्रीमियम घेतलेला आहे। तो अंडरलाइंग एसेट्स (रिलायंस शेयर्स) ला निर्धारित कीमत वर खरेदीदाराला एका ठराविक किमतीत विकण्यास बांधील असतो , आणि तो एक्सपायरी च्या दिवशी तुम्हाला रिलायन्सचे शेअर्स 2000 ला विकेल।

अशा प्रकारे, कमी किंमतीत शेअर्स खरेदी करून तुम्ही नफा मिळवू शकता

कॉल ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये, एका खरीददारा (Buyer) पाशी  अधिकार असतो

परंतु तो त्यासाठी बाध्य वा त्याने असेच केलेच पाहिजे याचे त्याच्या वर बंधन नसते कि त्याने कॉन्ट्रैक्ट मध्ये निर्धारित केल्या गेलेल्या  अंडरलाइंग स्टॉक (Underlying Assets) ला ठराविक वेळेत ठराविक किंमतीला आणि  ठराविक प्रमाणात खरेदी केलेच पाहजे।  

वरील उदाहरणाकडे आपण  पुन्हा बघितले तर , तुम्ही तो ऑप्शन बायर आहात (2300-2000-100=200) कि त्याचा 200 चा नफा आहे। 

पण येथे तुम्ही आता असा  विचार करत असाल की आणखी 100 का कमी केलेत, तर इथे हे 100  हे तुमचे प्रीमियम वैल्यू आहे जे कि तुम्ही ऑप्शन मध्ये पोजीशन घेण्यासाठी भरले आहे

जर मार्केट बुलिश ट्रेंड मध्ये  राहिला, तर कॉल ऑप्शन बायर यांना अमर्यादित नफा कमावण्याची संधी मिळते। जी स्ट्राइक आणि स्पॉट प्राइस यांच्यातील फरकाने मोजली जाते।  

पण तेथेच  एका  सेलर जो शेअर्स विकण्यासाठी  बंधनकारक असतो आणि त्यामुळे  बुलिश मार्केट  मध्ये  कॉल ऑप्शन सेलरचे खूप मोठ्या प्रमाणात  नुकसान होते।  

खालील दिलेल्या पाय ऑफ चार्टमध्ये, रेड झोन हा ऑप्शन बायरला  झालेले नुकसान दर्शवतो आणि ग्रीन झोन अमर्यादित नफा दर्शवतो।  

येथे जेव्हा स्ट्राइक प्राईसची  वैल्यू स्पॉट (strike price) स्पॉट प्राइस पेक्षा कमी असते तेव्हा बायरला नफा मिळतो।  जो त्याने भरलेल्या प्रीमियमच्या किंमतीनंतर सुरू होतो।  

पण येथे जर आपण सेलरच्या नफ्याबद्दल बोललो, तर सेलरला नफा हा  तेव्हाहि  होईल जेव्हा रिलायन्सचे शेअर्स एकतर 2000  वर  राहतील किंवा त्याची  वैल्यू या यापेक्षा हि खाली जाईल। 

पुट ऑप्शन मध्ये बेयरिश ट्रेंड मध्ये  एका बायरला अमर्यादित नफा  मिळते।  परंतु या  नफ्याची गणना  ब्रेकईव्हन पॉइंट नंतर केली जाते।   

पुट ऑप्शन सेलरला बेयरिश मार्केट मध्ये  अमर्याद  नुकसान सहन करावे लागते।  

कॉल ऑप्शन सेलर हा तेव्हाहि नफा मिळवतो, जेव्हा मार्केट हा सिडेवेस होतो। किंवा त्या पेक्षाही त्याची  किंमत घसरते आणि हा नफा केवळ प्रीमियमपुरता मर्यादित असतो।

आता आपण असे गृहीत धरूया  की रिलायन्सच्या शेअरची प्राइस खाली पडली आणि एक्सपायरीच्या दिवशी 1700 वर पोहोचली, कारण येथे तुम्ही ट्रेड करण्यास बांधील नाही, म्हणून तुम्ही सेटलमेंट शिवाय ट्रेडमधून बाहेर पडू शकता, परंतु तुम्ही जे  प्रीमियम भरला होता त्याचे  नुकसान तुम्हाला  सहन करावे लागेल

कॉल ऑप्शन बायर ला  मार्केट पडल्यावर नुकसान होतअसते  जो कि त्याच्या  प्रीमियम पर्यंतच  सीमित असते।

पुट ऑप्शन म्हणजे काय?

पुट ऑप्शन हा कॉल ऑप्शन च्या अगदी उलट आहे। आता वरील उदाहरणामध्ये थोडा बदल करूया आणि आता तुम्ही 2000  रुपयांच्या स्ट्राइक प्राइसवर पुट ऑप्शन विकत घेतला, ज्यासाठी तुम्ही 100 रुपये प्रीमियम देखील भरला

एक ट्रेडर पुट ऑप्शन ची तेव्हाच खरेदी करतो जेव्हा तो स्टॉक किंवा मार्केटबद्दल बेयरिश असतो

आता आपण असे गृहीत धरू चालूया की रिलायन्सच्या शेअर्सच्या किमती मध्ये  घसरण झाली। आणि एका महिन्यानंतर त्या शेअरची किंमत 1700 झाली ।

आता जसे कि तुम्हयेथे पुट ऑप्शन विकत घेतल्या असल्यामुळे तुम्हाला हा शेअर 2000 च्या हिशोबाने विकण्याचा अधिकार आहे 

आता जर तुमच्याकडे रिलायन्सचे शेअर्स असतील जे तुम्ही 2000 पेक्षा कमी किमतीत विकत घेतले असतील तर तुम्ही ते ऑप्शन सेलरला 2000 च्या किमती मध्ये विकू शकता

किंवा तुम्ही मार्केट मधून 1700 च्या हिशोबाने प्रति शेअरने शेअर खरेदी करू शकता आणि ते तुम्ही 2000  ला विकू शकता 

पुट ऑप्शन बायर ला  अंडरलाइंग एसेटला स्ट्राइक प्राइस वर  विकण्याचा अधिकार असतो आणि पुट ऑप्शन सेलर हा त्या किमतीत स्टॉक खरेदी करण्यास बाध्य होत असतो । 

अशा प्रकारे तुम्ही 200 (2000-1700-100) चा नफा मिळवू शकता 

येथे प्रीमियम 100 रुपये आहे जो तुम्ही या पोजीशन मध्ये ट्रेड करण्यासाठी  दिले होते।  पुट ऑप्शन मध्ये बेयरिश ट्रेंड मध्ये  एका बायरला अमर्यादित नफा  मिळते। 

परंतु या  नफ्याची गणना  ब्रेकईव्हन पॉइंट नंतर केली जाते।  या प्रकारे , पुट ऑप्शन सेलरला बेयरिश मार्केट मध्ये अमर्याद नुकसान सहन करावे लागते।  

आता आपण असे गृहीत धरू चालूया की मार्केट बुलिश झाली आहे। 

आणि एक्सपायरी संपेपर्यंत रिलायन्सच्या शेअरची किंमत 2200 झाली त्यामुळे अशा स्थितीत पुट ऑप्शन बायर ट्रेड एक्सेक्यूट करणार नाही, आणि प्रीमियम गमावून मार्केट मधून   एग्जिट घेईल 

त्यामुळे एकीकडे असे आहे जेथे , पुट ऑप्शन बायर हा  बुलिश मार्केट मध्ये प्रीमियम गमावतो

दुसरीकडे, पुट ऑप्शन सेलर प्रीमियममधून नफा कमावतो ।  आणि येथे सेलरचा नफा हा त्याच्या  केवळ प्रीमियम पुरताच मर्यादित असतो 

अशा प्रकारे, कॉल आणि पुट ऑप्शन्स (call and put option in Marathi)  अलग-अलग मार्केट ट्रेंडमध्ये बाय आणि  सेल पोजीशन मधून नफा कमविण्याची संधी देतात।  

Call and Put Option Difference in Marathi 

वरील उदाहरणावरून तुम्हाला ऑप्शन कॉल आणि पुट ऑप्शन याबद्दल समजले असेलच, तर मग त्यांच्यातील फरक जरा एकदा चांगल्या प्रकारे जाणून घेऊया 

difference between call & put option

कॉल आणि पुट ऑप्शनमधील फरक खाली दिलेल्या टेबल मध्ये स्पष्ट केला आहे : 

 निष्कर्ष

आतापर्यंत  तुम्हाला  समजलेच  असेल कि call and put option in Marathi  मध्ये खरेदी आणि विक्रीचा दृष्टीकोन काय आहे। 

म्हणून  जर तुम्ही स्टॉक किंवा इंडेक्स याबद्दल बुलिश असाल , तर तुम्ही कॉल ऑप्शन विकत घेऊ शकता किंवा पुट ऑप्शन विकू शकता। 

आणि सोबतच एका नवीन ट्रेडरने ऑप्शन ट्रेडिंगच्या टिपा (option trading tips in Marathi) वेळोवेळी पालन करणे  देखील महत्त्वाचे आहे

जेणेकरून तो योग्य  ऑप्शनची  खरेदी करू शकेल आणि मार्केटन मध्ये व्यवस्थित पणे ट्रेंड करू शकेल म्हणून, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट करण्यापूर्वी, योग्य स्ट्राइक प्राइस निवडणे अतिशय  महत्वाचे आहे। 

आणि जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकायचे हे जाणून घ्यायची असेल  व त्या बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर त्यासाठी मध्ये Stock Pathshala द्वारे stock market classes आपले  नावनोंदणी करू शकता

 

Before investing capital, invest your time in learning Stock Market.
Fill in the basic details below and a callback will be arranged for more information:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Free Demo Class To Learn Option Trading
Book Online Demo Class Now