Option Trading Tips in Marathi

option trading tips in marathi

ऑप्शन बद्दल एक व्यापक समज अशी आहे, की ते जटिल आणि धोकादायक आहेत। तथापि, वस्तुस्थिती अशी आहे की विविध मार्गांनी स्टॉकचा व्यापार करण्यासाठी ऑप्शन हे एक साधन आहे। जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग शिकायला सुरुवात करत असाल, तर ऑप्शन ट्रेडिंग मधील या 5 टिप्स (option trading tips in Marathi) तुमच्यासाठी खूप उपयुक्त होणार आहेत।

ऑप्शन ट्रेडिंग टिप्स 

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये (option trading in marathi) यश मिळवण्यासाठी, तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग मधील मूलभूत बेसिक्स, त्यामधील वापरण्यात  येणारी स्ट्रेटेजी आणि ट्रेडिंगच्या नियमाची माहिती असणे गरजेचे आहे।

आता बरेच ट्रेडर्स ऑप्शन ट्रेडिंग कसे करायचे?, याबद्दल संभ्रमात असतात। आणि त्याची गुंतागुंती व जटिलता बघून सुरुवातीलाच  घाबरतात। पण तुम्ही जर, या ऑप्शन ट्रेडिंग टिप्स योग्य प्रकारे वापरल्यातर या टिप्समुळे तुमचा नफा तुम्ही अनेक पटींनी वाढूवू शकता।

टीप 1 : ऑप्शन ट्रेडिंग मागचा उद्देश जाणून घ्या

शेअर बाजारात गुंतवणूक असो किंवा ट्रेडिंग असो, यामध्ये योग्य उद्दिष्ट ठेवून प्रवेश करणे महत्त्वाचे आहे। आता जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेड करू इच्छित असाल , तर आपण ट्रेडिंग का करत आहोत त्याची आपल्याला काय गरज आहे।आणि त्या मागील उद्देश जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे।

option trading tips in marathi

आता जर, आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगचा अर्थ समजला तर, यामध्ये बायर मार्केटमध्ये पोजीशन घेण्यासाठी प्रीमियम रक्कम भरतो। आता बायरच्या इच्छेनुसार जर मार्केट एक्सपायर झाले, तर तो नफा कमावतो। पण या विरुद्ध झाले, तर तो संपूर्ण प्रीमियम गमावतो।

अशी परिस्थिती येत असल्यामुळे,म्हणूनच तुम्ही मार्केटमध्ये येण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांचे आणि जोखमींचे योग्य प्रकारे मूल्यांकन करणे फार महत्वाचे आहे।

जसे की तुम्ही, ऑप्शन ट्रेडिंग याचा उपयोग बुलिश किंवा बेयरिश मार्केट मधून  नफा मिळविण्यासाठी  करत आहात किंवा तुमची ट्रेडिंग पोझिशन ला हेज करण्यासाठी तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत आहात।

एकीकडे, ऑप्शन ट्रेडिंग हि सेलरला प्रीमियम मधून पैसे कमविण्याची संधी उपलब्ध करून देते , तर दुसरीकडे, ते बायरला त्याची पोजीशन हेज करण्याचा पर्याय प्रदान करते,जेणेकरून तो त्याच्या ट्रेडिंग मधील रिस्क कमीत कमी करू शकेल।

म्हणून ज्या प्रकारे, ऑप्शन हे बायर आणि  सेलरसाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करते  आणि म्हणूनच तुम्ही तुमचे उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर ट्रेंड करणे खूप महत्त्वाचे ठरते।

जर तुम्ही ऑप्शन्समध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायचे ठरवले असेल, तर तुम्ही प्रथम मार्केटमधील वोलैटिलिटी और रिस्कला समजून घ्या,कारण या दोन्ही ट्रेडमधील रिस्क हि अनेक पटींनी आहे।

टीप 2: तुम्ही तुमच्या रिस्कला समजून घ्या आणि त्यानुसारच रिटर्नची गणना करा

विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ पण, ऑप्शन्स ट्रेडिंग तुम्हाला कमी जोखमीसह जास्त नफा कमविण्याची संधी  देते।

option trading risk management in marathi

याचा अर्थ असा की ,तुम्ही या प्रकारे ट्रेंड करू शकता कि ,जिथे तुम्हाला स्टॉकची ट्रेडिंग केल्यावर तुमची फायदेशीर होण्याची 50% शक्यता असते, तसेच ऑप्शनमधील तुमची जोखीम कमी करून, तुम्ही तुमच्या ऑप्शनला स्टॉकच्यातुलनेत अधिक फायदेशीर बनवू शकता। 

जर येथे  तुम्ही योग्य प्रकारे ऑप्शन ट्रेडिंग टिप्स फॉलो करून, जर तुम्ही योग्य प्रकारचा ऑप्शन ट्रेडिंग call and put option in Marathi, योग्य स्ट्रॅटजी आणि रिस्क मैंनेज केल्यास तर, तुम्ही  बुलिश, बेयरिश किंवा  स्थिर मार्केट मधेही नफा कमवू शकता।

परंतु तरीही, एका योग्य ट्रेडसाठी, तुम्हाला तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि सोबतच त्याचे रिटर्न रेश्यो याची माहित असणे आवश्यक आहे।

उदाहरणार्थ, जर तुम्ही अग्ग्रेसिव ट्रेडर असाल आणि ऑप्शन राइटिंग असेल किंवा तुम्हाला मोठ्या प्रमाणात ऑप्शन खरेदी करायची असेल, तर deep OTM  तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते।

तुम्ही कोणतीही ऑप्शन स्ट्रेटेजी (option trading strategies in Marathi) निवडा, पण सर्व गोष्टींचे लक्षपूर्वक मूल्यांकन केल्यानंतरच तुम्ही त्यात ट्रेड  करा।

टीप 3: योग्य स्ट्रेटेजी वापरून मार्केटमधील प्रत्येकस्थितीत नफा कमवा

वॉरन बफेचा असा विश्वास आहे की “जेव्हा लोक घाबरतात तेव्हा तुम्ही लोभी व्हा  आणि जेव्हा लोकलोभी असतात तेव्हा तुम्ही  सावधतेने  राहा।”

वरील ही म्हण सर्वात फायदेशीर ट्रेड शोधण्यासाठी वापरली जाऊ शकते। अशी कधीतरी एक वेळ असते ,जेव्हा स्टॉकचा दृष्टीकोन अत्यंत उदास असतो। परंतु त्याच वेळेस ऑप्शन ट्रेडर्सना हि एक मोठा नफा कमावण्याची संधी असते।

how to earn profit in options marathi

कोविडच्या काळात तुम्ही बघितलेच असेल की, जेव्हा मार्केट क्रैश झाले होते। आणि सगळे घाबरले होते, पण त्याच वेळेस असे काही ऑप्शन ट्रेडर्स होते। ज्यांनी त्या काळात एवढे पैसे कमवले जे किवर्षभरात कमावलेल्या कमाईपेक्षा किती तरी पट त्यांनी जास्त पैसा कमावला होता।

आणि जेव्हा बाजार आपल्या बॉटम स्थितीवर होता। तेव्हा प्रत्येकजण भीतीपोटी आपली होल्डिंग विकत होता। आणि दुसरीकडे काही असेही लोक होते जे मोठ्या प्रमाणावर खरेदी करत होते। आणि आता  तुम्ही पाहू शकता की सध्या मार्केट कुठे आहे।

म्हणूनच  जेव्हा लोक घाबरतात तेव्हाच काहीतरी मोठे करण्याची संधी मिळते।

आपण सर्वांनी  बघितलेच असेल, कि बातम्यांचे रिपोर्टों, बाजारातील गोंगाट इत्यादींमुळे शेअर्समध्ये वाढ आणि घसरण होते  अशा प्रकारच्या कार्यक्रमांदरम्यान ऑप्शनचा योग्य प्रकारे वापर करून,  आकर्षक नफ्याची अपेक्षा केली जाऊ शकते। परंतु जेथे लोभ आणि भीतीचा संबंध आहे तेथे जाणकार ट्रेडर्सनि संधी ओळखणे आवश्यक आहे। बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी तयार असणे ही एक संपत्ती आहे। ज्याचा वापर कसा करायचा हे अनुभवी ट्रेडर्सला माहीत असते।

तुम्ही नेहमीच नफ्याच्या बाजूने असाल असे प्रत्तेक वेळी होणार नाही , परंतु तुम्ही सतत योग्य संधी शोधत असाल, तर तुम्हाला यशस्वी पर्याय ट्रेडर बनण्यापासून काहीही रोखू शकत नाही। आणि ट्रेडिंग हा एक मोठा खेळ आहे म्हणून तुम्ही तुमचे लक्ष गेमलिंगवरून दूर करून यशस्वी ट्रेडर बनण्याकडे वळवा।

टीप 4 : ऑप्शनच्या वोलैटिलिटी वर नजर ठेवा

इम्प्लॉइड वोलैटिलिटी जी ऑप्शन ची वोलैटिलिटी जाणून घेण्यात मदत करते। त्याबद्दलची  संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपले पाऊल टाकले पाहिजे। यासाठी, तुम्ही स्टॉकच्या इम्प्लॉइड वोलैटिलिटी ला  (implied volatility meaning in Marathi)  हिस्टोरिकल वोलैटिलिटी शी तुलना करू शकता।

ऑप्शन ट्रेडिंग टिप्स मराठी

त्याचे योग्य विश्लेषण करून, भविष्यात स्टॉक किंवा इंडेक्स मध्ये कोणता ट्रेंड दिसू शकतो। हे आपण जाणून घेऊ शकता। इम्प्लॉइड वोलैटिलिटी मुळे, प्रीमियम खूप वेगाने वाढतो, ज्यामुळे तुम्ही योग्य वेळी ऑप्शन विकून, अनेक पट नफा मिळवू शकता।

दुसरीकडे, कमी इम्प्लॉइड वोलैटिलिटी सोबत  तुम्हाला कमी प्रीमियमसह ऑप्शन खरेदी करण्यास अनुमती देते, ज्यामुळे बायरला ऑप्शन ट्रेडिंगमधून नफा मिळवता येतो।

टीप 5: देशामधील आणि कंपनीच्या इव्हेंटबद्दल माहिती ठेवने

पुढची ऑप्शन ट्रेडिंग टिप्स आहेत कि , ज्यात ट्रेडरला मार्केट किंवा स्टॉकमध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल नेहमी जागरूक राहणे खूप महत्वाचे आहे।  कारण ते ऑप्शन मार्केटवर अनेक प्रकारे परिणाम करतात।

tips for option trading in marathi

आता, येथे मार्केट लेव्हल इव्हेंटचा अर्थ  इकॉनमी, इलेक्शन किंवा इतर दूसरे ग्लोबल इशूशी संबंधित असू शकतो, दुसरीकडे, स्टॉक इव्हेंट हा कोणत्याही कंपनीचा वार्षिक किंवा त्रैमासिक अहवाल असू शकते किंवा बाजारात कोणत्याही नवीन प्रोडक्टचे आगमन इत्यादी असू शकते।

आता अशा परिस्थितीत, ऑप्शन्स मार्केटमधील इम्प्लॉइड वोलैटिलिटी आणि स्टॉकच्या प्राइस वर मोठा परिणाम होतो, ज्याचा फायदा ट्रेडर घेऊ शकतात।

जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तर, जाणून घ्या शेअर मार्केटमध्ये एक्सपायरी म्हणजे काय?  (what is expiry in share market in Marathi )आणि ऑप्शन्स मध्ये त्याचे महत्त्व काय आहे।

 निष्कर्ष

वर दिलेल्या सर्व ऑप्शन ट्रेडिंग टिप्स दर्शवितात की पर्याय बायर  केवळ तेव्हाच पैसे कमवू शकतो जेव्हा मार्केट मध्ये  जोरदार मोमेंटम असते, मग ते वरच्या दिशेलाअसो किंवा खालच्या दिशेला। बाजार कुठेही जात नसतानाही तेव्हाही ऑप्शन सेलर पैसे कमवेल।

त्यामुळे जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर फक्त टिप-5 फॉलो करा  आणि जर तुम्ही ऑप्शन बायर असाल तर तुम्हाला आता समजले असेल की वेळ तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे। तर कृपया आम्हाला कळवा  की तुम्हाला या 5 ऑप्शन ट्रेडिंग टिप्स कशा वाटल्या।

हे जाणून घ्यायचे असल्यास आणि त्यातून जास्तीत जास्त फायदा कसे मिळवायचे,तर तुम्ही आमच्या stock market classes प्रवेश घेऊ शकता। आम्ही तुम्हाला शेअर बाजाराचे ज्ञान अगदी सोप्या पद्धतीने देऊ।

Before investing capital, invest your time in learning Stock Market.
Fill in the basic details below and a callback will be arranged for more information:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Free Demo Class To Learn Option Trading
Book Online Demo Class Now