Put Call Ratio Meaning in Marathi

ऑप्शनमध्ये ट्रेड करण्यासाठी , तुम्ही ऑप्शन चेन हि वापरलीच असेल।  पण ऑप्शन चेन हि काय इंडिकेट करत असते ? होय, तर ते स्ट्राइक किमती, प्रीमियम, ओपन इंटरेस्ट, आणि व्हॉल्यूम इत्यादी चे तपशील आहेत, परंतु ऑप्शन चेन यामध्ये पीसीआर म्हणजे काय (put call ratio meaning in Marathi) हे तुम्हाला माहिती आहे का?

बरं, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर , PCR हा पुट कॉल रेशो आहे जो संभाव्य दिशा म्हणजेच पॉसिबल डिरेक्टरीण  आणि मार्केटचा ट्रेंड  निश्चित करण्यात मदत करतो। 

या लेखात, ऑप्शन यातील  पीसीआर म्हणजे काय आणि पुट-कॉल रेशीओ डेटा वापरून ऑप्शनला कसे अनलाइझ करावे याबद्दल माहिती समजून घेऊया। 

पुट कॉल रेशीओ म्हणजे काय?

सर्वात प्रथम आपण , ऑप्शन चेन यामध्ये पीसीआर डेटा कुठे शोधायचा ते समजून घेऊया।  सर्वसाधारणपणे, पीसीआर डेटा हा ओपन इंटरेस्ट चा  वापर मोजला जात असतो , परंतु पीसीआर डेटा हा व्हॉल्यूम डेटा वापर करून देखील मोजले जाऊ शकते। 

पीसीआर ची व्हॅल्यू आपल्याला मार्केट ट्रेण्डचा पोटेन्शिअल आणि त्याचा ट्रेण्ड  समजण्यात मदत करत असते।  जे एका टेंडरला मार्केटमध्ये एक योग्य पोझिशन घेण्यास आणि या सोबतच पोटेन्शिअल रिव्हर्सल करण्यामध्ये सुद्धा मदत करते। 

पीसीआर हा मोजला जेव्हा जातो तेव्हा ऑप्शन ट्रेडिंग (option trading in Marathi) याचे वॉल्यूम आणि ऑप्शन कॉन्टॅक्ट यांची संख्या म्हणजेच एखाद्या विशिष्ट दिवसासाठी किंवा एखाद्या ठराविक टाईम पिरेडसाठी चा ओपन इंटरेस्ट हे दोघेपण विचारात घेतले जातात। 

तुम्हाला जर हा रेशीओ अधिक कार्यक्षमतेने युज करायचा असेल तर तुम्हाला यासाठी ते कशाप्रकारे मोजले जाते आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला काय इंडिकेट करते हे समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। 

How to Calculate OI PCR in Marathi?

प्रत्येक स्ट्राइक प्राईज सोबत संबंधित ओपन इंटरेस्ट व्हॅल्यू यासह  ऑप्शन चैन मध्ये,पुट आणि कॉल (call and put option in Marathi) या दोन्ही ऑप्शन साठी एकूण OI कॉन्ट्रॅक्ट तपशील आहेत (हे दिलेल्या ऑप्शन चेनमध्ये निळ्या रंगात हायलाइट केलेले आहेत)। 

आता पुट ऑप्शन OI व्हॅल्यू ही कॉल ऑप्शन OI च्या डेटासह  डिव्हाइड केल्यास आपल्याला मार्केट मधील पोटेन्शिअल ट्रेंड निश्चित करण्यात मदत होते। 

oi pcr

PCR (OI) = एका दिवसाचे पुट ओपन इंटरेस्ट /त्याच सेम दिवसाचे कॉल ओपन इंटरेस्ट

  • जर, PCR>1= तर ते आपल्याला असे सूचित करते की पुट सेलर हे कॉल सेलर  पेक्षा मार्केटमध्ये अधिक अग्रेसिव्ह आहे। 
  • आणि जर PCR<1= तर ते आपल्याला असे सूचित करते पुट ऑप्शन सेलरपेक्षा कॉल ऑप्शन सेलर  जास्त अग्रेसिव्ह आहे असे दर्शवते। 

आता ठीक या प्रमाणेच, व्हॉल्यूम डेटा वापरून पीसीआर व्हॅल्यू देखील आपण  निर्धारित करू शकते। 

How to Calculate Volume PCR in Marathi?

पीसीआर हा विशिष्ट दिवशी केलेल्या पुट आणि कॉल ट्रेडचे प्रमाण  यांना भागून काढला जाऊ शकतो। 

खालील दिलेल्या ऑप्शन चैनमध्ये (option chain analysis in Marathi) टोटल व्हॉल्यूम डेटा लाल रंगात हायलाइट केला आहे। 

option chain volume pcr

PCR (Volume) = Volume of put option/ Volume of a call option

पीसीआर (व्हॉल्यूम)=पुट ऑप्शनचा व्हॉल्यूम/कॉल ऑप्शनचा व्हॉल्यूम

  • जर व्हॉल्यूम PCR >1: याचा अर्थ असा की  पुट व्हॉल्यूम हा  कॉल व्हॉल्यूमपेक्षा जास्त आहे । जे मार्केट बेअरिश असे दर्शवते। 
  • आणि जर व्हॉल्यूम PCR < 1: तर याचा अर्थ असा की पुट ऑप्शन व्हॉल्यूम हा कॉल ऑप्शन व्हॉल्यूमपेक्षा कमी असल्याने, हे मार्केट बुलिश असल्याने दर्शवते।

pcr in option chain

निळी रेषा ही  अपल्याला NIFTY 50 चे पुट कॉल रेशिओ दर्शवते आणि लाल व्हॅल्यू ही स्पॉट व्हॅल्यू दर्शवित आहे। 

वर दिलेला ग्राफ हा NIFTY 50 आणि त्याचा PCR चा ग्राफ आहे। 

X- क्सिस ही आपल्याला टाईम पिरेड दर्शवते। तर Y- क्सिस हे प्राईस मधील बदलासह पुट-कॉल रेशिओ दाखवतो। 

जसे आपण पाहू शकता की ग्राफ मधील निळी रेषा ही  खाली जात आहे, म्हणजे PCR व्हॅल्यू 1 च्या खाली जाते, मार्केट मंदीत जाते म्हणजेच मार्केट बेअरिश आहे आणि वाईस वर्सा। 

आता  आपण पाहूया की  ऑप्शन ट्रेडर्स या पीसीआर हा कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतो। 

पीसीआर ऑप्शन चैन  विश्लेषणाचे महत्त्व | Importance of PCR Option Chain Analysis

पीसीआर व्हॅल्यूचे एनालिसिस केल्याने मार्केटचा ट्रेंड निश्चित करण्यात आणि मार्केट यामधील बदलांचा अंदाज लावण्यात मदत होते।  हे ऑप्शन ट्रेडिंगमधील एक महत्त्वाचे इंडिकेटर आहे आणि वर्तमान मार्केटचे सेंटीमेंट शोधणे: यामध्ये पण मदत करते:

  1. वर्तमान मार्केटचे  सेंटीमेंट शोधणे: PCR हे कोणत्याही वेळी वर्तमान मार्केट यामधील सेंटीमेंट जाणून घेण्यासाठी एक उपयुक्त टूल आहे। 
  2. प्राईज मोमेंट डायरेक्शन : PCR ट्रेडर्स ना सुप्रसिद्ध दिशात्मक पैज लावण्यास सक्षम करते अंडरलेईंग सिक्युरिटीज मधील प्राईज मोमेंट ची डायरेक्शन  ठरवण्यात त्यांना मदत करून। 
  3. कॉन्ट्ररी दर्शविण्यासाठी (उलट सूचित करण्यासाठी) : PCR हे एक विरोधाभासी इंडिकेटर आहे, जे के ट्रेडर्स यांना एका विशिष्ट मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचे निर्णय घेत असताना त्यांना झुंडीच्या मानसिकतेचे पालन करणे यापासून दूर ठेवते। 
  4. ट्रेडिंग बिहेवियर अनालिसिस: पुट-कॉल रेशियो मार्केट यामध्ये सहभागी झालेल्यांची सामान्य व्यापार शैलीचे म्हणजेच जनरल ट्रेडिंग स्टाईल परीक्षण करण्यात मदत करते। 

निष्कर्ष

पुट कॉल रेशो हे तुमच्या भविष्यातील मार्केटच्या अचूक अंदाजांसाठी अतिशय उपयुक्त इंडिकेटर आहे ।  तुम्ही ऑप्शन चैन याद्वारे त्याची सहज गणना करू शकता आणि मार्केटची डायरेक्शन जाणून घेण्यासाठी त्याचा वापर करू शकता।  आणि यासोबतच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नफा कमवण्याची संधी वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता। 

तुम्हाला यापेक्षा अधिक चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही ते दुसऱ्या इतर प्रकारच्या टेक्निकल इंडिकेटर सोबत  वापरू शकता।  आणि असे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी, तुम्ही नेहमी 3 पुष्टीकरण सिग्नलवर अवलंबून राहावे। 

जर तुम्ही पण ऑप्शन ट्रेडिंग सविस्तरपणे शिकण्यास इच्छुक असाल, तर आम्ही तुम्हाला असे सांगू इच्छितो की, तुम्ही आमच्या स्टॉक मार्केट कोर्समध्ये आपले नाव नोंदणी करू शकता। जिथे आम्ही तुम्हाला लाईव्ह उदाहरणाद्वारे शिकवत असतो आणि आमचे अनेक वर्षांचा अनुभव असलेले तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला टेक्निकल ऍनालिसिस सोबत मानसशास्त्रीय म्हणजेच सायकोलॉजिकल टिप्ससाठी पण मदत करू शकतात। 

स्टॉक मार्केट कोर्सेस आणि ते शिकण्याकरिता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी कॉल पण अरेंज करू शकतो यासाठी तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट फॉर्म  भरून घ्या। 

आणि जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकायचे हे जाणून घ्यायची असेल  व त्या बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर त्यासाठी मध्ये Stock Pathshala द्वारे option trading classes आपले  नावनोंदणी करू शकता

Before investing capital, invest your time in learning Stock Market.
Fill in the basic details below and a callback will be arranged for more information:

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Book Your Free Demo Class To Learn Option Trading
    Book Online Demo Class Now