Option Trading Kase Karave in Marathi

तुम्हाला माहीत आहे का, की जगातील जास्तीत जास्त यशस्वी ट्रेडर हे ऑप्शन ट्रेडिंग करतात कारण ऑप्शन्स ट्रेडिंग आपल्याल्या कोणत्याही मार्केट कंडीशन मध्ये कमी जोखमीसह जास्तीत जास्त नफा मिळवण्याची संधी देते। पण option trading kase karave in Marathi. 

स्टॉक ट्रेडिंग पेक्षा  ऑप्शन्स ट्रेडिंग हि आपल्याला जरा कठीण  वाटू शकते।  परंतु तुम्ही जर  ते योग्यरिती ने  समजून घेतल्यास, तर ऑप्शन्स हा सर्वोत चांगला मार्ग  आहे ट्रेडिग करण्याचा। 

आणि या सोबतच, जर तुम्हाला निफ्टी 50 मध्ये गुंतवणूक कशी करावी हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग याविषयी ज्ञान असायला हवे।  

एकीकडे स्टॉक ट्रेडिंग कडे बघितले गेले तर जेव्हा आपण एखाद्या  स्टॉकची खरेदी करत असतो तेव्हा आपण फक्त केवळ हेच ठरवत असतो कि आपल्यला किती शेअर हवे आहेत।

आणि तुमचा ब्रोकर सध्याच्या चालू बाजारभावावर किंवा तुमच्या द्वारे सेट केलेल्या निर्धारित  किंमतीवर त्याची ऑर्डर भरतो

परंतु ऑप्शन ट्रेडिंगसाठी गरजेची असते ते म्हणजे एक योग्य ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि त्याची समज (option trading strategies in Marathi) 

म्हणून जर तुम्हाला ऑप्शन्स ट्रेडिंग याला अधिक बारकाईने  समजून घ्यायचे असेल।  तर येथे खाली दिलेल्या या पाच स्टेप्स तुमच्यासाठी काही वरदानापेक्षा कमी नसतील। कारण या स्टेप्समध्ये तुम्हाला Option trading kase karave याचे संपूर्ण रोडमॅप समजावून सांगितले गेले आहेत ।  

ऑप्शन ट्रेडिंग कसे करावे?

स्टॉक मार्केटमधील कोणत्याही प्रकारच्या एक्सपोजरसाठी आपल्याकडे एक ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे, ज्यासाठी एका योग्य स्टॉक ब्रोकरची निवड करणे तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे ।  

येथे, जर तुम्हाला फक्त ऑप्शन ट्रेडिंगसाठी ट्रेडिंग खाते उघडायचे असेल, तर आपल्यासाठी हे जरुरी होऊन जाते कि एका चांगल्या स्टॉकब्रोकर ची  निवड करणे  जो कि  तुम्हाला  एका चांगल्या प सोबत तुम्हाला तो स्टॉकच्या विश्लेषणासाठी एक एडवांस ऑप्शन चैन पण प्रदान करून देईल ।  

तसेचअसे काही स्टॉक ब्रोकर आहेत जे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग बेसिक्स (option trading in Marathi समजावून सांगण्यासाठी वेगवेगळी माध्यमे उपलब्ध करून देतात   अकाउंट उघडल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य रकमेपासून सुरुवात करणे। 

एका नवीन सुरुवात करणाऱ्या ट्रेडरला हे नेहमी जाणून घ्यायचे असते की शेअर बाजारात नेमके किती पैसे गुंतवले जाऊ शकतातत्याची याचे  उत्तर असे आहे की, हे पूर्णपणे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर आणि ध्येयांवर अवलंबून आहे

परंतु जर आपण ऑप्शन बद्दल बोललो तर आपल्याला एका चांगल्या धन राशि सह ट्रेड करण्याची सुरुवात केली पाहिजे।  

आणि यासह, खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करून तुम्ही तुमचा ऑप्शन ट्रेडिंग प्रवास सुरू करू शकता । 

ट्रेडिंग खाते उघडा

तुम्ही ऑप्शंस मध्ये ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला एक  डिमॅट खाते आणि एक  ट्रेडिंग खाते उघडणे आवश्यक आहे।

कारण ज्या प्रमाणे आपल्याला बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बँकेत खाते उघडावे लागते। 

ठीक त्याप्रमाणेच जर तुम्हाला शेअर बाजारात ट्रेंडिग करायचे असेल तर तुम्हाला कोण्या एका  ब्रोकरकडे ट्रेडिंग खाते उघडावे लागेल।  

how to choose a stockbroker in marathi

सध्याच्या परिस्थितीत  भारतात बरेच असे स्टॉक ब्रोकर मार्केट मध्ये अव्हेलेबल आहेत. आणि त्यामधून तुम्हाला स्टॉक ब्रोकर निवडण्यात अडचण येऊ शकते कि त्यापैकी तुमच्यासाठी कोणता स्टॉक ब्रोकर सर्वोत्तम आहे?

त्यामुळे याच गोष्टीला समजून घेऊन येथे काही खास गोष्टी सांगितल्या आहेत ।  ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी एक योग्य स्टॉक ब्रोकर सहज निवडू शकता। 

  • सर्वात प्रथम एक ट्रेडर , स्टॉक ब्रोकर निवडताना पाहतो ती पहिली गोष्ट म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगसाठी किती शुल्क आकारले जात आहे। 
  • एक प्रकारे, एक असा स्टॉक ब्रोकर निवडा कि ज्याचे ब्रोकरेज चार्जेस कमी आहेत आणि इतर चार्जेस सुद्धा कमी आहेत। कारण आपल्याला खूप लांब वेळेसाठी यामध्ये  ट्रेड करायचा आहे।  जर त्यांचा जर  शुल्क जास्त असेल तर, त्यामुळे तुमचा नफा कमी होऊ शकतो ।  
  • एक असा स्टॉक ब्रोकर निवडा ज्याचे ट्रेडिंग पोर्टल आणि प हे अगदी सोपे आहे।  आणि ज्यामध्ये फार कमी टेक्निकल गिलिच आहेत।  कारण कधी कधी  काही स्टॉक ब्रोकर्सच्या पोर्टल आणि पमध्ये काही  टेक्निकल गिलिच होत असतात। त्यामुळे ट्रेडर्सना खूप मोठे नुकसान सहन करावे लागते ।
  • आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, असा एक ब्रोकर निवडा जो एक चांगली आणि प्रगत एडवांस ऑप्शन चैन उपलब्ध करून देतात  

जेणेकरून योग्य विश्लेषण करून तुम्ही तुमची योग्य स्ट्रेटेजी निवडू शकता.आणि त्याद्वारे तुम्ही तुमचा नफा वाढवू शकता  ।  

ऑप्शनच्या बेसिक्सला समजून घ्या 

आपल्याला जर कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर सर्वात आधी आपण त्याची बेसिक्स माहिती समजून घेतली पाहिजे। उदाहरणार्थ, जर आपल्याला इंग्रजी लिहायचे,वाचायला शिकायचे असेल, तर सर्वात प्रथम आपण अल्फाबेट  (A – Z) शिकतो आणि नंतर इंग्रजीचे नियम शिकतो, त्यानंतरच आपण भाषा शिकू शकतो

option trading in marathi

ठीक त्याचप्रमाणे, जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचे असेल, तर सर्वात प्रथम तुम्हाला ऑप्शन मधील बेसिक्स माहिती समजून घ्यावी लागेल।  

ऑप्शनच्या बेसिक्स गोष्टींमध्ये अनेक विषयांचा समावेश होतो जसे कि – ऑप्शन काय आहेत,ऑप्शन कोणकोणत्या प्रकारचे असते, ऑप्शन कसे कार्य करतात आणि याव्यतिरिक्त आणखी बऱ्याच काही  गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो  

नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑप्शनची बेसिक्स माहिती समजून घेतल्याशिवाय तुम्ही कधीच एक ऑप्शन ट्रेडर होऊ शकत नाही। 

कारण ऑप्शनचे  हे  बेसिक्स तुमच्या साठी तुमचा पाया म्हणून काम करतील  

आणि ज्याप्रमाणे इमारतीचा मजबूत पाया हा संपूर्ण इमारत मजबूत बनवत असतो। ठीक त्याचप्रमाणे, ऑप्शन ट्रेडिंग टिप्स आणि नियमांचे योग्य प्रकारे पालन करून आणि त्याच्या बेसिक्स गोष्टीं अवगत करून आणि त्याबद्दल जागरूक राहून, तुम्ही एक यशस्वी ऑप्शन ट्रेडर बनू शकता । 

योग्य ऑप्शनची निवड करणे

एखादा ऑप्शन कधी विकत घ्यायचा किंवा तो कधी विकायचा हे समजून घेण्याच्या आधी।  तुम्हाला ऑप्शन बायर  आणि ऑप्शन सेलर याबद्दल माहिती असणे अतिशय आवश्यक आहे। 

how to choose right option in marathi

  • ऑप्शन बायर :- ऑप्शन बायर हा फार कमी पैशात आपली ट्रेडिंग सुरू करू शकतो ।  कारण ऑप्शन खरेदी करणाऱ्याला फक्त ऑप्शन प्रीमियम भरावा लागतो।  परंतु ऑप्शन बायरची नफा क्षमता हि ऑप्शन  सेलर च्या तुलनेत खूपच कमी असते। 
  • ऑप्शन सेलर :- ऑप्शन सेलर बनण्यासाठी  तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये  मार्जिन काही ठेवावे लागेल।  आणि म्हणून याच कारणांमुळे ऑप्शन  सेलरला अधिक पैशांची आवश्यकता असते। पण जेव्हा पासून SEBI ने नवीन मार्जिन नियम लागू केले आहेत  तेव्हापासून ऑप्शन सेल्लिंग साठी लागणारी मार्जिनची आवश्यकता कितीतरी अधिक पटींनी वाढली आहे।  परंतु एवढे असून सुद्धा एका ऑप्शन बायर पेक्षा ऑप्शन सेलर कडे नफा मिळवण्याची प्रवृत्ती जास्त असते।

ऑप्शन ट्रेडिंगसाठी तुमच्या कडे उपलब्ध  असलेल्या भांडवलानुसार तुम्हाला ऑप्शन बायर बनायचे आहे की ऑप्शन सेलर बनायचे आहे हे तुम्ही ठरवू  शकतात

आता आपण ऑप्शनच्या प्रकारांबद्दल बोलूया, जे आहेत कि कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन (call and put option in Marathi

कॉल ऑप्शन:- कॉल ऑप्शन हा एक करार आहे जो तुम्हाला ठराविक वेळेच्या आत एका पूर्वनिर्धारित किंमतीवर स्टॉक खरेदी करण्याचा अधिकार देतो, परंतु असे करायचेच आहे असे बंधन नाही।

पुट ऑप्शन:- पुट ऑप्शन तुम्हाला कराराची मुदत समाप्त होण्याच्या पहिले आधीच ठरवलेल्या किंमतीवर  शेअर्स विकण्याचा अधिकार देतो, परंतु असे करायचेच आहे असे बंधन नाही।

आता आपण कोणत्या दिशेने कोणता ऑप्शन खरेदी करणार किंवा विक्री करणार आहे ते बघूया।

    • जर तुम्हाला असे वाटत असेल की स्टॉकची किंमत हि वाढणार आहे तेव्हा :कॉल ऑप्शन विकत घ्या किंवा पुट ऑप्शनची विक्री करा।  
    • जर तुम्हाला असे वाटत असेल की स्टॉकची किंमत हि स्थिर राहील तेव्हा :कॉल ऑप्शनची विक्री करा आणि पुट ऑप्शनची देखील विक्री करा. 
    • जर तुम्हाला असे वाटत असेल की स्टॉकची किंमत हि खाली जाईल तेव्हा :पुट ऑप्शन विकत घ्या।  किंवा कॉल ऑप्शनची विक्री करा  

योग्य स्ट्राइक प्राइसची निवड करणे

कोणत्याही स्टॉक किंवा इंडेक्स ची स्ट्राइक प्राइस  (strike price in Marathi) ही ती प्राइस असते ज्या किंमतीवर तुम्हाला भविष्यात ट्रेड करायचा आहे. हि ती  वैल्यू आहे जी एक्सचेंज यांच्याद्वारे ठरवली जात असते । 

choose strike price in marathi

ऑप्शन्स यामध्ये ट्रेडिंग करताना तूम्हाला स्ट्राइक प्राइसची निवड हि अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते  

ज्यासाठी तुम्ही ऑप्शनमध्ये मोनीनेसची माहिती मिळवू शकता।  जे तुम्हाला इन्ट्रिंसिक वैल्यू आणि  स्ट्राइक प्राइस यांच्याशी संबंधित असलेल्या प्रीमियम आणि रिटर्नची गणना करण्यात मदत करते।  

यासाठी आपण एक ऑप्शन ट्रेडिंगचे उदाहरण घेऊया  (option trading example) एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 1000 वर ट्रेड करत आहे असे आपण सध्या विचारात घेऊया ,आणि  तो शेअर भविष्यातील कोणत्या तरी तारखेपर्यंत 1050 पर्यंत वाढेल,तेव्हा तुम्ही ₹1050 पेक्षा कमी स्ट्राइक किमतीसह कॉल पर्याय खरेदी करू शकता।  

आणि त्याचप्रमाणे, भविष्यातील त्या तारखेपर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत जर 1000 पेक्षा कमी झाल्यास, तेव्हा तुमचा नफा हा कमी होत जाईल , परंतु तुमचा जास्तीत जास्त तोटा हा ऑप्शन खरेदी करताना तुम्ही जो  भरलेला प्रीमियम असेल तेवढा तुमचा तोटा होईल। 

त्याचप्रमाणे, जर तुम्हाला जर असे वाटत असेल की एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 500 वर  ट्रेड करत आहे आणि भविष्या मध्ये  कोणत्या तरी एखाद्या तारखेपर्यंत ती  450 पर्यंत घसरेल, तर तुम्ही 450  पेक्षा कमी असलेल्या स्ट्राइक प्राईज सोबत एका  पुट ऑप्शनची  खरेदी करू शकता।  

मग कंपनीच्या शेअरची किंमत जशी जशी 450 च्या जवळ जाईल तेव्हा तुमचा नफा हा वाढत जाईल ।  आणि त्याचप्रमाणे, जर भविष्यातील त्या तारखेपर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत जशी जशी 500 पेक्षा वाढल्यास, तसा तसा तुमचा नफा हा  कमी होत जाईल।  यामध्ये देखील, ऑप्शन खरेदी करताना तुमचा जास्तीत जास्त तोटा हा तुमचा प्रीमियम आहे।

यासह, योग्य स्ट्राइक प्राइसची  निवड करण्यासाठी, तुम्हाला आणखी इतर पॅरामीटर्स सुद्धा पहावे लागतील जसे की- ओपन इंटरेस्ट, इम्प्लॉइड वोलैटिलिटी (implied volatility meaning in Marathi), आणि  ऑप्शन ग्रीक इत्यादी ।

तुम्हाला या प्रत्येक गोष्टीचे पूर्ण ज्ञान अवगत झाल्यावर , तुम्ही एका योग्य स्ट्रेटेजी सोबत ऑप्शन यामध्ये ट्रेड करू शकता।

ऑप्शनची वेळ मर्यादा सेट करा

पण इथे आपण सर्वात आधी शेअर मार्केट मध्ये एक्सपायरी म्हणजे काय असते  (what is expiry in share market in Marathi ) याविषयी समजून घेऊया।  

ऑप्शन एक्सपायरी ही एक तारीख आहे ज्यावर ऑप्शन कॉन्ट्रेक्ट (प्रीमियम) हा त्या भविष्यातील तारखेवर शून्य होऊन जाईल म्हणजेच तो त्या भविष्यातील तारखेवर पूर्णपणे एक्सपायर होईल।

choose option expiry in marathi

ऑप्शन कॉन्ट्रेक्टसाठी तीन वेगवेगळ्या ऑप्शन एक्सपायरी आहेत:

  • नियर मंथ । Near Month (1 महीना)
  • मिडिल मंथ । Middle Month (2 महीना)
  • फार मंथ । Far Month (3 महीना) 

जर तुम्ही इंडेक्स मध्ये ऑप्शन  ट्रेडिंग करत असाल तर  तिथे तुम्हाला साप्ताहिक एक्स्पायरीचा पर्याय सुद्धा  दिला जातो

प्रत्येक ऑप्शनचा एक एक्सपायरी कालावधी असतो जो सूचित करतो की भविष्यातील त्या तारखेच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही तो ट्रेड ठेवू शकता।

 उदाहरणार्थ, सध्या निफ्टी हा 17000 वर  ट्रेड  करत आहे आणि तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करू इच्छित आहेत तर त्यामुळे तुम्ही साप्ताहिक एक्सपायरी (साप्ताहिक एक्सपायरी हि फक्त इंडेक्ससाठी आहे स्टॉक यासाठी नाही) किंवा मासिक एक्स्पायरी यासह ट्रेड करू शकता।

पण आता आपण असे गृहीत धरू चालूया की या महिन्याच्या अखेरीस निफ्टी 17500 किंवा त्याहून अधिक वर जाऊ शकेल तेव्हा १७५०० कॉल ऑप्शन त्या महिन्याची जी शेवटची एक्सपायरी आहे त्यावर खरेदी करा।

ऑप्शन एक्सपायरीच्या  तारखा या साप्ताहिक पासून ते महिन्यांपर्यंत असू शकतात।

परंतु त्यामध्ये साप्ताहिक ऑप्शन हे सर्वात जोखिम याने भरलेले असतात म्हणजेच धोकादायक असतात । आणि विशेष म्हणजे बहुतेक अनुभवी ऑप्शन ट्रेडर्स  यात ट्रेड करतात  

दीर्घ एक्सपायरी हि स्टॉकला वर जाण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध  करून देत असतो जे एका ऑप्शन खरेदीदाराला नफा मिळविण्याचा अवसर प्रदान  करते  

परंतु येथे प्रीमियम ला समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे.परंतु बर का समजून घ्यायचे आहे? तर

कारण ऑप्शनची एक्स्पायरी डेट हि जितकी जास्त असेल तितकाच जास्त ऑप्शन हा महाग होईल म्हणजेच तुम्हाला ऑप्शन विकत घेण्यासाठी जास्त प्रीमियम भरावा लागेल।

दीर्घ एक्स्पायरी हि देखील उपयुक्त आहे कारण ऑप्शन हे  वेळेचे मूल्य टिकवून ठेवू शकतो।  जरी स्टॉक हा  स्ट्राइक प्राईस च्या खाली ट्रेड करत असला तरी।  

एखाद्या ऑप्शनची मुदत संपुष्टात येताच त्याच्या वेळेचे मूल्य कमी होऊन जाते ,आणि हे ऑप्शन बायर  त्यांच्या खरेदी केलेल्या ऑप्शनचे  मूल्य असे कमी होताना पाहू इच्छित नाहीत  

ऑप्शनची एक्स्पायरी हि  जितकी दूर असेल तितक्या हळूहळू पणे एक्स्पायरीचे अवमूल्यन होईल.आणि तुम्हाला टारगेट पर्यंत पोहचण्यासाठी म्हणजेच लक्ष्य गाठण्यासाठी अधिक वेळ मिळेल।  

ते म्हणतात ना की Time is Money , तर इथे ते खूप चांगल्या प्रकारे लागू होते ।

जर मार्केटच्या परिस्थित यामध्ये कोणताही बदल झाला नाही, तर त्यामुळे तुमच्या ऑप्शन प्रीमियमचे मूल्य हे सतत कमी होत जाते।  

आता अशा परिस्थितीत, ज्या एका ऑप्शन बायर ज्याने मार्केट मध्ये  लॉन्ग पोजीशन घेतलेली असेल तर अशा ऑप्शन बायरचे नुकसान होते।  

दुसरीकडे, ज्या ऑप्शन सेलर ज्याने प्रिमियम घेऊन ऑप्शन विकला आहे, तो नफा कमावतो, तर यावरून असा अंदाज लावला जाऊ शकते कि मार्केट हा in the money expire होऊ शकते ।

Option Intraday Trading Kase Karave in Marathi 

खूप सारे अनेक असे सुद्धा ट्रेडर आहेत ज्यांना माहिती नसते की, ते ऑप्शनमध्ये इंट्राडे ट्रेडिंग देखील करू शकतात 

होय! तुम्ही सकाळी या ऑप्शनला बाय किंवा  सेल करून आणि इंट्राडे ट्रेडिंग चा टाइम खतम होण्याच्या पहिले तुम्ही तुमच्या पोजीशनला कव्हर करून ट्रेडमधून बाहेर पडू शकता।  

आता  इंट्राडे ट्रेडिंगमध्य option trading kase karave, तर त्यासाठी तुम्हाला योग्य अशा ऑप्शन ट्रेडिंग ची स्ट्रॅटेजी वापरावी लागेल। 

जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल, तर तुम्ही फक्त जवळच्या एक्सपायरी असलेल्या ऑप्शन मधेच  ट्रेड केले पाहिजे।  कारण त्याचा प्रीमियम हे कमी असते। आणि इम्प्लॉइड वोलैटिलिटी आणि अन्य पैरामीटर या बाबींचा त्यावर जास्त असर होत असतो। त्यामुळे तूम्हाला एक योग्य ट्रेड करता येईल।  

हो पण, यात जोखिम पण जास्त प्रमाणात आहेत.आणि म्हणून खूप काळजीपूर्वक विचार करा आणि योग्य एनालिसिस  करून तुम्ही मार्केट मध्ये  ट्रेड केले पाहिजे ।

ऑप्शन यामध्ये इंट्राडे कसे ट्रेड करायचे हे समजून घेण्यासाठी, आपण एक उदाहरण समजून घेऊया :

असे मानून चालूय  कि निफ़्टी हा 17000  वर ट्रेड करत आहे आणि आजच्या केलेल्या एनालिसिस याला  अनुसार आपल्यला बुलिश ट्रेंड असल्याचे संकेत मिळत आहे । तर आता अशा परिस्थितीत तुम्ही एकतर कॉल ऑप्शन विकत घ्याल किंवा पुट ऑप्शन ची विक्री कराल।  

असे मानून चालूय कि, समजा तुम्ही कॉल ऑप्शन विकत घेण्याचे ठरवले आहे.  पण आता तुमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे कि एका योग्य स्ट्राइक प्राइस याची निवड करणे।

तर नवशिक्या ट्रेडर यांच्यासाठी येथे एक टीप आहे कि ऑप्शन मध्ये  इंट्राडे करण्यासाठी आउट-ऑफ़-द-मनी वाले ऑप्शन हे अधिक चांगले आहेत।

कारण त्यामध्ये प्रीमियम हे कमी असते।

तर आता  एक पायरी येथे सोडवली गेली आहे ,पण यथे दुसरी पायरी सुद्धा आहे  तर आता ती दुसरी पायरी म्हणजे OTM यामध्ये कोणत्या स्ट्राइक प्राइसची निवड करायची ? तर त्यासाठी तुम्ही ओपन इंटरेस्ट याच्या डेटाला एनालाइज केले पाहिजे।  

अधिकतर त्या स्ट्राइक प्राइसवर पर्याय ऑप्शन घेणे अधिक चांगले आणि फायदेशीर होत असते।  जिथे ओपन इंटरेस्ट (open interest meaning in marathi) ची वैल्यू हि वाढली  आहे आणि त्यासोबत त्या स्ट्राइक प्राइसचे प्रीमियमची वैल्यू देखील वाढली आहे।  

यामुळे हे संकेत मिळत आहे कि  त्या स्ट्राइक स्ट्राइक प्राइस वर जास्त बायर आहेत। याच्या मदतीने तुम्ही कमी जोखीमवाली पोजीशन घेऊन नफा मिळवू शकता।

याशिवाय तुम्ही एटीएम कॉल ऑप्शन सुद्धा घेऊ शकता.कारण मार्केट जर  तुमच्या अनुसार बुलिश असेल, तर त्यामध्ये प्रीमियम हे झपाट्याने बदलत असतो , त्यामुळे तुमचा नफा कमावण्याची शक्यता हि वाढते।

हे सर्व समजून घेतल्यावर, तुम्हाला ऑप्शनच्या स्ट्रेटेजीला योग्यरित्या समजून घेतल पाहिजे आणि कोणत्या मार्केट कंडीशन मध्ये कोणती स्ट्रेटेजी हि अधिक फायदेशीर ठरु शकते याचे ज्ञान असले पाहिजे ।  

निष्कर्ष

ऑप्शन ट्रेडिंग हि  तुम्हाला चांगला नफा कमावण्याची संधी देते पण या मध्ये गरजेचे आहे ते तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग हि  योग्य पद्धतीने केले पाहिजे । ज्यासाठी तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग टिप्स याचा वापर करू शकता।  आणि शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून तुम्ही जास्त नफा कमवू शकता। 

अधिक नफा कमावण्यासाठी, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगचे नियम आणि त्या संबंधित टिप्स फॉलो करा (option trading tips in Marathi) आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून आपला नफा वाढवा 

आणि जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकायचे हे जाणून घ्यायची असेल  व त्या बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर त्यासाठी मध्ये Stock Pathshala द्वारे option trading classes आपले  नावनोंदणी करू शकता

Before investing capital, invest your time in learning Stock Market.
Fill in the basic details below and a callback will be arranged for more information:

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Book Your Free Demo Class To Learn Option Trading
    Book Online Demo Class Now